ट्रम्प यांना नोबेल मिळवण्याची घाई!   

‘न्यूयॉर्क टाईम्स’ची जोरदार टीका

वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना विश्वासात न घेताच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघर्षबंदीसाठी मध्यस्थी केली. त्यावरून ‘ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्याची घाई’, या मथळ्याखाली ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने लेख प्रसिद्ध करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 
 
न्यूयॉर्क टाइम्सने लेखात म्हटले आहे की, ट्रम्प यांनी संघर्षबंदीची घोषणा केल्यावर भारत कमालीचा नाराज झाला. खरेतर आधी अमेरिका यात पडण्यास इच्छूक नव्हता. मात्र, भारताने पाकिस्तानच्या आण्विक अस्त्र भांडारावर मारा केल्यावर ट्रम्प यांनी यात लक्ष घातले आणि संघर्षविरामाची घाई केली. 
 
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील हवाईतळावर हल्ला केला होता. त्यावेळी पाकिस्तान घाबरला होता. कारण, तिथून जवळच काही अंतरावर किराना हिल्स येथे पाकिस्तानच्या अणवस्त्रांचा साठा आहे. भारताने याठिकाणी हल्ला केल्यामुळेच पाकिस्तान संघर्षबंदीसाठी इतक्या लवकर राजी झाला, अशीही चर्चा होती. 
 

Related Articles